Sushil Kumar Modi : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन
नवी देहली – भाजपचे ज्येष्ठ नेते तथा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे १३ मे या दिवशी कर्करोगामुळे निधन झाले आहे. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्यावर येथील एम्स रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांच्या पार्थिवावर बिहारची राजधानी पाटलीपुत्र येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पार्टी में अपने मूल्यवान सहयोगी और दशकों से मेरे मित्र रहे सुशील मोदी जी के असामयिक निधन से अत्यंत दुख हुआ है। बिहार में भाजपा के उत्थान और उसकी सफलताओं के पीछे उनका अमूल्य योगदान रहा है। आपातकाल का पुरजोर विरोध करते हुए, उन्होंने छात्र राजनीति से अपनी एक अलग पहचान बनाई थी। वे… pic.twitter.com/160Bfbt72n
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2024
पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, मित्र सुशील मोदी यांच्या आकस्मिक निधनाने दुःख झाले. बिहारमध्ये भाजपचा उदय आणि यश यांत त्यांचे अमूल्य योगदान होते. आणीबाणीला त्यांनी कडाडून विरोध केला. त्यांनी विद्यार्थीदशेत असतांना राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. या दु:खाच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत.