पूर्वीचा वित्त आयोगाचा निधी न वापरल्याने ग्रामपंचायतींना कचरा विल्हेवाटीसाठी यंदा निधी नाही

१४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगाने दिलेला निधी १०० टक्के वापरण्याविषयी पंचायतींना सूचना

पणजी, १३ मे (वार्ता.) – २०२४-२५ या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये गोवा सरकारकडून ग्रामपंचायतींसाठी कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासंबंधी निधीचे प्रावधान करण्यात आलेले नाही. १४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगाकडून पंचायतींना कचरा विल्हेवाटीसाठी दिलेल्या निधीचा वापर करण्यात गोव्यातील ग्रामपंचायती अपयशी ठरल्याने राज्य वित्त आयोगाने गोवा पंचायत योजना २०१७ या योजनेखाली (कचर्‍याची विल्हेवाट करण्यासंबंधी) पंचायतींना यासंबंधी आर्थिक साहाय्य देण्याविषयी कोणतेही प्रावधान  केलेले नाही. पंचायत संचालनालयाकडून यासंबंधी गटविकास अधिकार्‍यांना कळवण्यात आले असून गटविकास अधिकार्‍यांनी त्यांच्या अधिकाराखाली येणार्‍या पंचायतींना ‘१४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगाने कचरा विल्हेवाटीसाठी दिलेल्या निधीचा १०० टक्के वापर करण्यात यावा, असे कळवावे’, असा आदेश दिला आहे.

संपादकीय भूमिका 

कचरा विल्हेवाट ही राज्यातील प्रमुख समस्या असतांना त्यासाठीचा निधी न वापरणार्‍या पंचायती !