‘समुद्रात उडी मारायची आहे’, असे सांगत विमानात मुसलमान प्रवाशाचे विचित्र वर्तन !
मंगळुरू (कर्नाटक) – दुबई येथून मंगळुरू येथे येणार्या एअर इंडियाच्या विमानात महंमद बी.सी. नावाच्या प्रवाशाने विचित्र वर्तन केले. अरबी समुद्रावर पोचताच ‘मला एकट्यालाच समुद्रात उडी मारायची आहे’, असे ओरडत त्याने विमानात गोंधळ घातला. विमानाचे सुरक्षा संयोजक सिद्धार्थ दास यांनी प्रवासी महंमद बी.सी. याच्या विरुद्ध मंगळुरू येथील बज्वे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
दुबई येथून विमानाने उड्डाण केल्यानंतर थोड्या वेळातच महंमद याने कृष्णा नावाच्या व्यक्तीविषयी कर्मचार्यांकडे चौकशी केली. या नावाची व्यक्ती विमानात प्रवास करत नसल्याचे कर्मचार्यांनी महंमदला सांगितले. महंमद याने अनेक वेळा सेवा बटन दाबून कर्मचार्यांना अनावश्यक त्रासही दिला.