मुंबई विमानतळावर ९ सहस्र ६१० ग्रॅम सोन्यासह चौघांना अटक !
सीमाशुल्क विभागाची कारवाई !
मुंबई – सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या दोन भिन्न कारवायांध्ये ९ सहस्र ६१० ग्रॅम सोन्यासह चौघांना अटक केली. त्यात केनिया देशाच्या रहिवासी असलेल्या तीन महिलांचा समावेश आहे. दोन्ही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सुमारे ६ कोटी ८२ लाखाहून अधिक रुपये आहे. (वारंवार होणारी सोन्याची तस्करी रोखण्यासाठी सीमाशुल्क विभाग ठोस उपाययोजना कधी काढणार ? – संपादक)
१. पहिल्या कारवाईत दुबईहून मुंबई विमानतळावर आलेल्या अमित जैन या रहिवाशाला सीमाशुल्क विभागाने थांबवले. त्याच्याकडे सोन्याचे ४४ लगड सापडले. आरोपीकडून एकूण ५ सहस्र १२७ ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत तीन कोटी २४ लाख ७७ सहस्र रुपये आहे. या प्रकरणी जैन याला सीमाशुल्क विभागाने अटक केली.
२. दुसर्या कारवाईत केनिया येथून आलेल्या समीरा अबिदी, फैजा हसन आणि फरदोसा अबिदी अशी या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३३ सोन्याच्या लगड जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून एकूण ४ किलो ४८३ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. आरोपी महिलांना या प्रकरणी अटक करण्यात आली.