कुणाचे स्वभावदोष बघून त्याची घृणा करू नका आणि त्याचे वाईट चिंतू नका !
‘सर्वांशी प्रेमयुक्त पवित्र व्यवहार करा. व्यवहार करतांना ‘ज्याच्याशी आपण व्यवहार करतो, त्याच्या हृदयात आपलाच प्रेमळ ईश्वर विराजमान आहे. त्याच्याच सत्तेने सर्वांच्या हृदयाचे ठोके चालत आहेत’, हे लक्षात ठेवा. कुणाचे स्वभावदोष बघून त्याची घृणा करू नका आणि त्याचे वाईट चिंतू नका. दुसर्यांची पापे उघडी करण्यापेक्षा उदारपणे त्यावर पांघरूण घाला.’
(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)