Chittapur Basveshwar Poster Torn : चित्तापूर (कलबुर्गी) येथे बसवेश्वराचे चित्र असलेले फलक धर्मांधांनी फाडले !
(वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
चित्तापूर (कर्नाटक) – कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर येथे बसव जयंतीनिमित्त लावलेले बसवेश्वराचे चित्र असलेले फलक धर्मांधांनी फाडून टाकल्याचे समोर आले आहे. फलक फाडून बसवेश्वराचा अवमान केल्याचे समजताच वीरशैव लिंगायत समाजाचे युवा नेते आनंद पाटील नरबोळी, जगदेव दिग्गांवकर, प्रसाद अवंटी, अंबरीश सुळेगांव, संतोष हावेरी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी बसवेश्वराच्या अवमानाच्या कृत्याचा निषेध केला. त्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करून आरोपींवर कारवाई करण्याचा आग्रह धरला. पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन रेड्डी घटनास्थळी पोचले. फलक फाडण्याचे कृत्य करणार्या समाजकंटकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी लिंगायत समाजाच्या नेत्यांना दिले.