लोकसभेच्या ४ थ्या टप्प्याचे महाराष्ट्रात ५२.४९ टक्के मतदान !
मुंबई – लोकसभेच्या ४ थ्या टप्प्याचे १३ मे या दिवशी महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांत मतदान झाले. यामध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत नंदुरबार ६.६०, जळगाव ५१.९८, रावेर ५५.३६, जालना ५८.८५, छत्रपती संभाजीनगर ५४.०२, मावळ ४६.०३, पुणे ४४.९०, शिरूर ४३.८९, अहिल्यानगर ५३.२७, शिर्डी ५२.२७, तर बीड ५८.२१ टक्के मतदान झाले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान झाले.