परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी रायगड जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती
१. श्री. अजय खोत, खांदा कॉलनी
१ अ. कार्यालयातील काम वेळेत पूर्ण होऊन जन्मोत्सवाचा कार्यक्रम पहाता येणे : ‘दळणवळण बंदीच्या काळात मी घरी राहून कार्यालयाचे काम करत असल्याने प्रतिदिन ४० ग्राहकांना संपर्क करणे बंधनकारक होते. तेव्हा माझ्या मनात ‘गुरुदेवांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम पहायला मिळेल ना ?’, असा विचार आला. त्या वेळी मी ‘गुरुदेवच काळजी घेतील’, असा विचार करून सकारात्मक राहिलो. परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम चालू असल्यामुळे माझे मन कामात लागत नव्हते. त्या वेळी मला वाटले, ‘आधी भावजागृतीचा प्रयोग करूया.’ भावजागृतीचा प्रयोग झाल्यावर कार्यालयातून मला ‘तुमचे आजचे काम पूर्ण झाले आहे’, असा निरोप आला. तेव्हा ‘गुरुदेवच आपली काळजी घेतात’, असे वाटून माझी पुष्कळ भावजागृती झाली. त्यानंतर पुढील सोहळा मी विनाअडथळा पाहू शकलो.’
२. कु. ज्योत्स्ना मनवळ (आताच्या सौ. ज्योत्स्ना खोत), खांदा कॉलनी
२ अ. ‘गुरुदेवांचे चरण आपल्या हातांवर घ्यावेत’, असे वाटणे आणि ‘त्यासाठी आपले मन निर्मळ व्हायला हवे’, याची जाणीव होणे : ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आपले चरण श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हातांवर ठेवल्याचे पाहून मलाही ‘गुरुदेवांचे चरण आपल्या हातांवर घ्यावेत’, असे वाटले. तेव्हा मला ‘गुरुदेवांचे चरण हातांवर घेण्यासाठी आपले मन निर्मळ व्हायला हवे’, याची जाणीव झाली.’
३. सौ. मांडवी भरत बुगडे, नवीन पनवेल
‘सोहळ्याच्या शेवटी कृतज्ञतागीत चालू झाल्यावर माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी चांगल्या संवेदना जाणवल्या.’
४. सौ. योगिता सावंत, खांदा कॉलनी
४ अ. ‘१५.५.२०२० या दिवशी सकाळी उठल्यावर मला प्रसन्न वाटले आणि माझा आतून नामजप चालू झाला.
४ आ. जन्मोत्सवाचा कार्यक्रम चालू झाल्यावर ‘ब्रह्मांडातील देवीदेवता तेथे उपस्थित आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी संपूर्ण सृष्टी शांत वाटत होती.
४ इ. ‘सजीव आणि निर्जीव, असे सर्व जण या कार्यक्रमात सहभागी झाले असून ते आनंदी आहेत’, असे मला जाणवले.’
५. सौ. सीमा सचिन राऊळ, नवीन पनवेल
५ अ. ‘भावसोहळ्यात मला गुरुमाऊलींचे दर्शन झाले. तेव्हा ते मला ‘मी तुझ्याकडून साधना करून घेणार आहे आणि तुला सांभाळणार आहे. तू केवळ एक पाऊल पुढे टाक’, असे सांगत आहेत’, असे मला जाणवले.
५ आ. गुरुदेव भरभरून चैतन्य देत असल्याचे दृश्य दिसणे : जन्मोत्सवाच्या वेळी मला पुढील दृश्य दिसले, ‘मी गुरुदेवांच्या चरणांशी बसले आहे आणि त्यांच्याकडे व्याकुळतेने पहात आहे. गुरुदेव मला आशीर्वाद देत आहेत. मी उभी राहून गुरुदेवांच्या पुढे माझ्या हातांची ओंजळ धरत आहे. तेव्हा ते मला भरभरून चैतन्य देत आहेत. माझी ओंजळ चैतन्याने भरून वाहू लागली आहे; म्हणून मी माझ्या साडीचा पदर पुढे करत आहे. तेव्हाही गुरुदेव मला चैतन्य देतच आहेत.’
६. कु. वैष्णवी मिसाळ, कामोठे
‘जन्मोत्सवाच्या सोहळ्यात जेव्हा भक्तीगीत चालू व्हायचे, तेव्हा घरात लावलेल्या समईची वात सारखी हलायची आणि भक्तीगीत थांबल्यावर ती स्थिर व्हायची. त्या वेळी ‘वातीलाही आध्यात्मिक भावाचा स्पर्श समजत आहे’, असे मला जाणवले.’
७. श्रीमती राजश्री रमेश भगत, उरण
७ अ. परात्पर गुरु डॉक्टर यांचे अस्तित्व जाणवणे : ‘सकाळी उठल्यावर माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप चालू झाला. सकाळी ९.३० वाजता नामजप करतांना मला घरातील सर्व खोल्यांत सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टर दिसत होते. ‘प.पू. भक्तराज महाराज आणि गुरुदेव पलंगावर बसून बोलत आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले. त्या वेळी माझ्या मनाला पुष्कळ आनंद वाटत होता. माझे मन शांत होते. माझ्याकडून सतत कृतज्ञता व्यक्त होत होती.’ (क्रमशः)
|
या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/793868.html