Intellectual Discrimination Of Hindus : (म्हणे) ‘ख्रिस्ती झाल्याने मी मृत्यूवर मात करू शकले !’ – तमिळी अभिनेत्री मोहिनी श्रीनिवासन्
तमिळी अभिनेत्री मोहिनी श्रीनिवासन् यांचे वक्तव्य !
बेंगळुरू (कर्नाटक) : ‘कल्याण मंटप’ या चित्रपटाद्वारे कन्नड समाजात परिचित झालेल्या तमिळ अभिनेत्री मोहिनी श्रीनिवासन् यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी एका तमिळ यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मी धर्मांतरित झाले नसते, तर जिवंत राहिले नसते. मी आत्महत्या केली असती !
१. वर्ष २००६ मध्ये मोहिनी यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. त्या स्वत:चे अनुभव सांगतांना म्हणतात की, काही वेळा ‘मी कशाला जगायला हवे ?’, ‘हे जीवन कशाला हवे ?’, असे विचार माझ्या मनात यायचे. त्यानंतर मी निराशेत गेले. अतिशय वाईट स्वप्ने पडू लागली. झोपमोड होऊ लागली. आरोग्यही खालावले. यानंतर ज्योतिष आदींना मी भेटले; परंतु मला कशाचाच लाभ झाला नाही. हे सर्व झाल्यानंतर देव कोण ? हे मी शोधू लागले. तेव्हा येशू ख्रिस्त माझ्या स्वप्नात आला. या स्वप्नानंतर मी स्वातंत्र्य अनुभवू लागले. वाईट स्वप्ने हळूहळू अल्प होऊ लागली. माझे आरोग्य सुधारू लागले. आत्महत्येचे विचार थांबले. मन शांत होऊ लागले. खरे सांगायचे झाले, तर येशू ख्रिस्ताने मला अनेक वेळा वाचवले आहे.
(स्त्रोत : Shalom World)
२. मोहिनी यांनी दावा करतांना पुढे म्हटले की, माझ्या डोक्यात वाईट विचार आल्यावर एकदा माझा हात मी चाकूने घायाळ केला. एकदा कोका-कोलामध्ये उंदराचे विष घालून ते प्यायले. देहाचे काहीतरी होईल म्हणून मी वाट पहात होते; परंतु मला काही झाले नाही. एकदा मी झोपेच्या १३६ गोळ्या घेतल्या. या सर्व प्रसंगांत येशूनेच मला वाचवले, असा दावाही त्यांनी या वेळी केला.
संपादकीय भूमिका
|