घाटकोपर (मुंबई) येथे वादळामुळे होर्डिंग कोसळले; ८० वाहने अडकल्याची शक्यता !
वडाळा येथे पार्किंग टॉवर कोसळला
घाटकोपर – येथे मोठ्या वादळामुळे एका विज्ञापनाचे मोठे लोखंडी होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. त्याच्या खाली ८० वाहने अडकली आहेत. बचावकार्य चालू आहे. येथे प्रतिदिन १ मिनिटांत साधारण १०० वाहने पेट्रोल भरण्यासाठी येथे येत असतात. आतापर्यंत येथून घायाळ झालेल्या ७ जणांना बाहेर काढण्यात आले, तर ४-५ गाड्यांची पुष्कळ हानी झाली. अग्नीशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा येथे युद्धपातळीवर बचाव कार्य करत आहे. घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
वडाळा येथे पार्किंग टॉवर कोसळला. क्रेन आणण्यात आलेली आहे. काही गाड्यांची हानी झाली. अडकलेल्या ३० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.