Ajmer Maulana Murder : लैंगिक शोषण केल्यावरून मदरशांतील अल्पवयीन मुसलमान मुलांनी केली मौलवीची हत्या !
अजमेर (राजस्थान) – अजमेर जिल्ह्यातील रामगंज भागात एका मशिदीच्या महंमद ताहीर (वय ३० वर्षे) या मौलवीच्या हत्येच्या प्रकरणी ६ अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. मौलवीने त्यांचे लैंगिक शोषण केल्याने या मुलांनी त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या मुलांनी ताहीर हा घेत असलेल्या दहीमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या. त्यामुळे तो गाढ झोपी गेल्यावर या मुलांनी त्याला प्रचंड मारहाण केली आणि गळा दाबून त्याची हत्या केली. ही घटना २६ एप्रिलच्या रात्री घडली.
Fed up of sexual abuse, underage m@dr@sa students kill Maulana !
Historically, it has been noticed that most m@dr@sas serve as hubs of sexual abuse of children and #terrorist producing factories.
Therefore, shutting down all m@dr@sas nationwide is an apt solution !
Neither… pic.twitter.com/0jvYFfcebl
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 13, 2024
पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांनी ताहीरची हत्या केल्यानंतर आम्हाला माहिती देतांना सांगितले की, मास्क घातलेले ३ पुरुष मशिदीत घुसले आणि मौलवीवर आक्रमण केले. आम्ही शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आणि उत्तरप्रदेशातील ताहीरची ८ वर्षांची पार्श्वभूमी तपासल्यानंतरही या प्रकरणात काहीही निष्पन्न होत नव्हते. यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना विश्वासात घेतले. त्यानंतर मुलांनी सर्व घटनाक्रम उघड केला. मदरशातील एका विद्यार्थिनीचे ताहीरने लैंगिक शोषण केले होते. तसेच तो या विद्यार्थ्यांचेही शोषण करत होता. जेव्हा एका विद्यार्थाने हा प्रकार उघड करण्याची धमकी दिली, तेव्हा ताहीरने त्याला पैशाचे आमिष दाखवले. पुढे ताहीरच्या सततच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्यांनी त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्याला पहिल्यांदा झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर काठीने बेदम मारहाण केली आणि दोरीने गळा आवळून हत्या केली.
संपादकीय भूमिका
|