Protected Forest For Tamnar Project : गोव्यातील तमनार प्रकल्पासाठी धारबांदोडा येथील १७ हेक्टर भूमी संरक्षित वनक्षेत्र म्हणून अधिूसचित
पणजी, १२ मे (वार्ता.) : तमनार वीजवाहिनी प्रकल्पासाठी गोव्यातील ७८.२९७ हेक्टर भूमी वापरण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर झाडे लावून पर्यावरणाची होणारी हानी भरून काढण्यासाठी राज्याच्या वन खात्याने सांगोड, धारबांदोडा येथे १७.२२८ हेक्टर भूमी संरक्षित वनक्षेत्र म्हणून अधिूसचित केले आहे. सांगोड, धारबांदोडा येथील सर्वेक्षण क्रमांक २१/२, २२/२ आणि २४/१-अ संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
तमनार प्रकल्पासाठी सरकारने शेल्डे ते म्हापसा ४०० के.व्ही. डी/सी, तसेच शेल्डे येथे २२० के.व्ही. एच्.टी.एल्.एस्. वीजवाहिनी बसवण्यासाठी ७८.२९७ हेक्टर भूमी वापरलेली आहे.