पाश्चात्त्यांप्रमाणे भारतात नश्वर शरीराच्या पोषणासाठी चाललेली आंधळी धावपळ !
‘सध्या भारतात जिथे पहावे, तिथे स्थूल शरिराचा भोग, स्थूल ‘मी’चे पोषण आणि नश्वर पदार्थांच्या मागे आंधळी धावपळ चालली आहे. शाश्वत आत्म्याचा घात करून नश्वर शरिराच्या पोषणासाठीच संपूर्ण जीवन, अक्कल आणि बुद्धीमत्ता लावली जात आहे. पाश्चात्त्य देशांचा हा कचरा भारतात वाढत चालला आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये ‘अधिकाधिक सुविधासंपन्न कसे होऊ शकतो ? अधिक वस्तू कशा प्राप्त करू शकतो ?’, हेच ध्येय आहे. तेथे सुविधा आणि धन यांनी संपन्न व्यक्तीला मोठा मनुष्य मानतात. त्याउलट भारतात माणूस अत्यल्प वस्तूंमध्ये चरितार्थ करू शकतो.’ (साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)