नाम घेणे म्हणजे सद्गुरूंच्या हातात स्वतःचा हात देणे होय !
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी लोकांना भक्तीमार्गाकडे वळवले. त्यासाठी नामस्मरणाचा महिमा सांगितला. ते म्हणत, ‘एका नामामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी लागणारे सर्व गुण आहेत. जेथे नाम आहे तेथेच मी आहे. तुम्ही तुमच्यापाशी नाही, इतका मी तुमच्याजवळ आहे. मला हाक मारा की, मी पुढे आहेच. तुम्ही सतत नाम घेत रहा, म्हणजे तुम्हाला सोडून मला रहाताच येणार नाही. मी निर्लेप (शुद्ध) नामामध्ये रहातो. तुम्ही निर्लेप, निर्विकल्प नाम घ्या. माझ्या सहवासाची प्रचीती आल्यावाचून रहाणार नाही. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे, यापलीकडे मला कसलीच अपेक्षा नाही. नाम घेणे म्हणजे माझ्या (सद्गुरूंच्या) हातात स्वतःचा हात देणे होय. अशा रितीने ज्याने माझ्या हातात स्वतःचा हात दिला, तो मी सरळ रामाच्या हातात नेऊन पोचवला.
(‘पू. (प्रा.) के.वि. बेलसरे यांचे आध्यात्मिक सामर्थ्य’ या फेसबुकवरून साभार)