छत्रपती संभाजीनगर येथे अभियांत्रिकी तरुणी घरातून चालवत होती गर्भलिंग निदान केंद्र !

छत्रपती संभाजीनगर – एका उच्चभ्रू वस्तीत गर्भलिंग निदान केंद्र चालवले जात असल्याची माहिती आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांना मिळाली होती. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी एका इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर धाड घातली. या वेळी एका खोलीत गर्भलिंग निदान करण्यात येत असल्याचे पथकाच्या लक्षात आले, तसेच घटनास्थळी १२ लाख ७८ सहस्र रुपयेही मिळाले. विशेष म्हणजे हे गर्भलिंग निदान केंद्र अभियांत्रिकी तरुणी चालवत होती. या वेळी या तरुणीच्या खोलीत सोनोग्राफीसाठी लागणारे साहित्य, लॅपटॉप, टॅबही सापडले. सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका : 

आजच्या तरुणांची फसवेगिरी ! अशांना कठोर शिक्षाच हवी !