यापुढे मी निवडणूक लढणार नाही ! – एकनाथ खडसे
मुंबई – मला निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. यापुढे मी निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा एकनाथ खडसे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केली.
या वेळी एकनाथ खडसे म्हणाले, ‘‘मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते; मात्र आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही. माझा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे मी निश्चिंत आहे. माझ्या भाजप प्रवेशाला गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा विरोध नाही. त्यांची अप्रसन्नता ज्या कारणामुळे होती, ती दूर झाली आहे. मोदी पंतप्रधान व्हावेत, असे लोकांना वाटत आहे. केंद्राच्या तुलनेत राज्य सरकारच्या कामगिरीविषयी लोकांची अप्रसन्नता आहे.’’