Pakistani Spy Arrested:भरूच (गुजरात) येथून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्याला अटक
भरूच (गुजरात) – गुजरात पोलिसांनी अंकलेश्वर येथून प्रवीण मिश्रा या पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्याला अटक केली आहे. प्रवीण पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चा हस्तक होता. त्याने भारतीय सुरक्षा दलांनी वापरलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन तंत्रज्ञान यांविषयी आय.एस्.आय.ला महत्त्वाची माहिती दिल्याचा आरोप आहे.
प्रवीण इस्लामाबाद आणि कराची येथील पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि सैन्याधिकारी यांना माहिती देत होता. फेसबूक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सपद्वारे माहिती पाठवली जात होती. प्रवीण जीआयडीसीच्या कारखान्यात काम करायचा आणि वायूदलाची माहिती अन् छायाचित्रे गोळा करून पाकिस्तानला पाठवायचा.
संपादकीय भूमिकाअशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! |