माहीम (मुंबई) येथे लोखंडी रॉडने आक्रमण करणार्यांवर गुन्हा नोंद !
मुंबई – माहीममधील एका परिसरात पूर्ववैमनस्यातून केलेल्या आक्रमणात एक जण घायाळ झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अनिरुद्ध गोड (वय ३२ वर्षे) आणि त्याचा मित्र योगेंद्र पारखे या दोघांवर संकेत साठे अन् त्याचे साथीदार यांनी आक्रमण केले. लोखंडी रॉड, काठी यांनी दोघांना मारहाण करण्यात आली. या हाणामारीत योगेंद्र गंभीर घायाळ झाला. या प्रकरणी अनिरुद्ध गोड याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार अनिरुद्ध गोड याचे माहीमच्या कपडा बाजारात उपाहारगृह आहे. या हॉटेलची तक्रार करण्यावरून त्यांच्यात वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले.
संपादकीय भूमिकादिवसेंदिवस अधिक धोकादायक आणि असुरक्षित होत चाललेली मुंबई ! |