Hijab Girl Will Be Indian PM : (म्हणे) ‘एक दिवस हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल !’ – असदुद्दीन ओवैसी
असदुद्दीन ओवैसी यांचे चिथावणीखोर विधान !
भाग्यनगर (तेलंगाणा) – एक दिवस असा येईल की, हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल, असे वक्तव्य ‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगर आणि भाग्यनगर येथे १३ मे या दिवशी मतदान होणार असून दोन्ही ठिकाणी आम्हाला विजय मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे, असेही ते म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.
Asaduddin Owaisi's provocative speech.
'India's first Mu$|!m Prime Minister will be a woman in Hijab.'
👉 The Hindus of India will never let Owaisi's fantasy become true. As a piece of advice, Owaisi and like minded Mu$|!m$ can move to any !$|@m!c land and have their dream… pic.twitter.com/TQoIMhbuFr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 12, 2024
ओवैसी पुढे म्हणाले की, १०-११ राज्यांमध्ये मुसलमानांना तिकीट न दिल्यास त्यांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व अल्प होईल. इंडी आघाडी मुसलमानांना तिकीट देत नाही. जसे महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत; पण एकही मुसलमान उमेदवार दिलेला नाही. त्याचप्रमाणे राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, देहली येथेही मुसलमान उमेदवार नाही. लोक जात, बेरोजगारी, महागाई इत्यादींवर मत देत आहेत.
ओवैसी म्हणाले की, ‘टू नेशन थिअरी’ म्हणजेच द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत तुम्हीच (हिंदूंनीच) मांडला, तुमच्याच प्रमुखांनी मांडला. आम्ही आज भारतात आहोत आणि राहू. तुम्ही माझे म्हणणे ऐका. आम्ही याच भूमीत जन्मलो आणि याच भूमीत मरणार आहोत. आता पुन्हा मोठ्या प्रमाणावर (मुसलमानांचे) स्थलांतर होणार नाही.
संपादकीय भूमिका
|