Yogi Adityanath Responds Manishankar : भारताचे अणूबाँब काय ‘फ्रीज’मध्ये ठेवण्यासाठी आहेत का ? – योगी आदित्यनाथ
काँग्रेसचे मणीशंकर अय्यर यांच्या पाकिस्तानच्या ‘अणूबाँब’वरील वक्तव्याला योगी आदित्यनाथ यांचे उत्तर !
नवी देहली : काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर यांनी ‘पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, त्याच्याकडे अणूबाँब आहे’, असे वक्तव्य केले होते. यावर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आमचे अणूबाँब काय ‘फ्रीज’मध्ये ठेवण्यासाठी आहेत का ?
हमारे एटम बम फ्रिज में रखने के लिए हैं क्या! pic.twitter.com/boH7bjLHGe
— Yogi Adityanath (मोदी का परिवार) (@myogiadityanath) May 11, 2024
मणीशंकर अय्यर हे काँग्रेसचे ‘मणी’ असू शकतात; पण भारताचे असू शकत नाहीत. हा नवा भारत आहे. नवा भारत कुणालाही छेडत नाही; पण जो आम्हाला छेडतो, त्याला आम्ही सोडत नाही. आम्ही संबंधितांच्या घरात घुसून उत्तर देऊ. अशा प्रकारे उत्तर दिले आहे. आज परिस्थिती अशी आहे की, एखादा फटाका जोरात फुटला, तरी पाकिस्तान म्हणतो ‘नाही, माझा त्यात हात नाही !’ त्याच्या मनात हे भय निर्माण होणे, हे नव्या भारताचे यश आहे.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच फूट पाडण्याचे राजकारण केले आहे. त्यांनी आधी धर्माच्या आधारे देशाची फाळणी केली. त्यानंतर भाषा आणि प्रदेश यांच्या आधारे देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वर्ष १९४७ मध्ये देशाची फाळणी केली. काँग्रेस आजही पाकिस्तानचे गुणगान गात आहे.