Iran Threatens Israel : इस्रायलने आमच्या अणू केंद्रांवर आक्रमण केले, तर आम्ही अणूबाँब बनवू !
इराणची इस्रायलला धमकी !
तेहरान (इराण) : आम्ही अद्याप अणूबाँब बनवण्याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही; पण आवश्यकता भासल्यास आम्ही आमचा निर्णय पालटू शकतो. जर इस्रायलने आमच्या अणू केंद्रांवर आक्रमण केले, तर आम्हाला स्वतःच्या संरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याचे पाऊल उचलावे लागेल, अशी धमकी इराणने दिली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे सल्लागार कमल खरराजी यांनी हे विधान केले आहे. इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये एप्रिल मासापासून तणाव निर्माण झाला आहे. इराणने इस्रायलवर ३ सहस्रांहून अधिक रॉकेटचा मारा केल्यानंतर इस्रायलनेही इराणच्या अणू केंद्रांजवळ क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.
#Iran Threatens #Israel : इस्रायलने आमच्या अणू केंद्रांवर आक्रमण केले, तर आम्ही अणूबाँब बनवू !
इराणची इस्रायलला धमकी !#IranIsraelconflict https://t.co/fEiJyJYT41
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 12, 2024
याआधी जानेवारीमध्ये संयुक्त राष्ट्रांचे अणू निरीक्षक आणि तज्ञ डेव्हिड अल्ब्राइट यांनी इराणच्या आण्विक कार्यक्रमाबाबत मोठा दावा केला होता. ते म्हणाले होते की, आवश्यकता भासल्यास इराण पहिला अणूबाँब काही आठवड्यांत बनवू शकतो. जर त्याला हवे असेल, तर तो ५ महिन्यांत १२ अणूबाँब बनवू शकतो.