रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

१. श्री. किशोर पडवळ, उद्योगपती, रायगड, महाराष्ट्र.

अ. श्री भवानीमातेच्या मूर्तीचे दर्शन घेतांना मला प्रत्यक्ष श्री भवानीमातेचे दर्शन झाले.

आ. ‘संगीत आणि संशोधन’ : हे संशोधन पहातांना ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे’, तसेच ‘गुरुकृपेविना आध्यात्मिक उन्नती होत नाही’, हे सत्य गुरुदेवांच्या कृपेने लक्षात आले. गुरुकृपा आहे, तेथेच आनंद आणि शांती आहे.

इ. रामनाथी आश्रम म्हणजे या ‘युगातील वैकुंठ’ ! : ‘सनातन आश्रम म्हणजे या ‘युगातील वैकुंठ’ आहे’, असे मला वाटले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’ (१५.६.२०२३)

२. श्री. वामन दत्तात्रेय सामंत, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रम पाहून पुष्कळच आनंद झाला.

आ. आश्रमाचे कार्य एवढे चांगले आहे की, येथे पुनःपुन्हा येण्याची इच्छा होत आहे.’

३. श्री. आदेश चौहान, सहारनपूर, उत्तरप्रदेश.

अ. ‘आश्रम पाहून फारच छान अनुभव आला.

आ. आपण एवढे चांगले कार्य करत आहात की, जे शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही.’

४. श्रीमती कुसुम शुक्ला, गाजियाबाद.

अ. ‘मी स्वतःला पुष्कळच सौभाग्यशाली समजते की, मी प्रथमच या आश्रमात आले. मला पुष्कळच सुंदर अनुभव आला.’

५. श्री. प्रवीण कांबोज, ‘राघव पुरम’, सहारनपूर, उत्तरप्रदेश.

अ. ‘आश्रम पाहून माझे अध्यात्माविषयीचे आकर्षण आणखी वाढले.’

६. श्रीमती कुसुम शुक्ला, वसुंधरा, गाजियाबाद.

‘आश्रमदर्शन करतांना मला सकारात्मकतेची अनुभूती आली. ‘माझे शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होत आहेत’, असे मला वाटले. ‘मी आणि माझ्या मुलांनी साधना शिकावी’, अशी मी आता आपल्या आदरणीय गुरुदेवांच्या चरणी अंतःकरणापासून इच्छा व्यक्त करते. ‘गुरुदेवांनी ‘माझी उन्नती व्हावी’, असा आशीर्वाद मला द्यावा’, अशी मी प्रार्थना करते.’

प्रभु, मला आपल्या चरणकमली सदैव सेवारत ठेवावे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २०.६.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक