Israel Attack Against US Threat : अमेरिकेच्या धमकीकडे दुर्लक्ष करत इस्रायलकडून रफाहवर आक्रमण – १५ जण ठार !
तेल अवीव (इस्रायल)/ कैरो (इजिप्त) : इस्रायलने अमेरिकेच्या धमकीकडे दुर्लक्ष करत गाझा पट्टीतील रफाह शहरावर आक्रमण केल्याचे वृत्त आहे. रफाहमध्ये इस्रायलच्या हवाई आक्रमणात गेल्या २४ घंट्यांत १५ लोकांचा मृत्यू झाला. हमासने रफाहच्या पूर्व भागात दबा धरून इस्रायली रणगाड्यांवर आक्रमण केले. इस्रायली रणगाड्यांनी पूर्व रफाहच्या निम्म्या भागाला घेरले आहे. इस्रायली रणगाड्यांनी आधीच दक्षिणेकडून पूर्व रफाह येथे जाणारे मार्ग बंद केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘रफाहवर आक्रमण केल्यास शस्त्र पुरवठा रोखण्यात येईल’, अशी धमकी इस्रायलला दिली होती.
Israel attacks Rafah ignoring US threat – 15 dead#IsraelUnderAttack #HamasTerrorists #GazaWar pic.twitter.com/VDy5w5sK1y
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 11, 2024
दुसरीकडे इस्रायल समर्थकांनी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयावर आक्रमण केले आणि त्याला आग लावली.