Congress Creates Fear Psychosis : काँग्रेसला पाकच्या अणूबाँबची भीती असल्यानेच ती पाकव्याप्त काश्मीरचा ताबा सोडण्यास सिद्ध ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
भाग्यनगर (तेलंगाणा) : काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर म्हणतात की, पाककडे अणूबाँब आहे आणि त्यामुळे भारताने पाकव्याप्त काश्मीरविषयी बोलू नये. पाकिस्तानकडे अणूबाँब असल्याच्या भीतीमुळे सर्वांत जुना पक्ष (काँग्रेस) पाकव्याप्त काश्मीरवरील भारताचे नियंत्रण सोडू इच्छित आहे.
पाकिस्तान के एटम बम की धमकी देने वाला इंडी गठबंधन सुन ले… PoK हमारा है, इसे कोई नहीं छीन सकता। pic.twitter.com/FZxqnlh0rP
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) May 10, 2024
असे असले, तरी जनतेने काळजी करू नये. मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या गोळ्यांना तोफेने उत्तर दिले जाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे झालेल्या एका प्रचारसभेत ११ मे या दिवशी केले.