हिंदूंचे धर्मांतर आणि हिंदु देवतांची होणारी विटंबना थांबवा !
विश्व हिंदु परिषदेची पुणे पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी !
पुणे – आनंदनगर येथील सनसिटी रस्त्यालगत असलेल्या वस्तींमध्ये फिरून काही अनोळखी लोक ख्रिस्ती धर्माचा प्रसार करून धर्मांतर करत आहेत. येशूच केवळ देव असून हिंदु देवतांची अवहेलना करून आणि गरीब लोकांना पैशांचे अन् इतर आमीष दाखवून हे धर्मांतर करत आहेत. (यातून हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह धर्मांतरबंदी कायद्याची आवश्यकता स्पष्ट होते. – संपादक) या आधी या लोकांनी काही कुटुंबांचे धर्मांतर केले आहे. ‘हनुमान देव नसून माकड आहे. गणपतीचे तोंड विचित्र आहे. त्यांची पूजा करून काही साध्य होणार नाही. हिंदु देवतांचे चित्र आणि मूर्ती फेकून द्या. केवळ येशूच देव असून तोच तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो’, अशा प्रकारच्या भाकड कथा सांगून ते लोकांची फसवणूक करत आहेत. अशा लोकांवर त्वरित न्यायालयीन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सिंहगड येथील विश्व हिंदु परिषदेने पोलिसांना निवेदनाद्वारे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांच्या ते लक्षात का येत नाही ? – संपादक)