(म्हणे) ‘ज्या पक्षाचा, विचारधारेचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांच्यासह मी जाणार नाही !’ – शरद पवार
पुणे येथील पत्रकार परिषद !
पुणे – ३ टप्प्यातील मतदानानंतर पंतप्रधान मोदी अस्वस्थ झाले आहेत. मोदींमुळे संसदीय लोकशाही संकटात आली आहे. मोदींनी केजरीवाल आणि सोरेन यांना कारागृहात टाकले, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच मोदींच्या ‘ऑफर’वर पवार म्हणाले की, ज्या पक्षाचा, विचारधारेचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांच्यासह मी जाणार नाही. ते पुणे येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
शरद पवार यांनी २ दिवसांपूर्वी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे राजकीय भाकीत केले होते. यावरून राजकारण रंगलेले असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘शरद पवार यांनी अजित पवारांसमवेत यावे आणि उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह यावे’, अशी खुली ‘ऑफर’ दिली होती. यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिले आहे.