अमरावतीचे श्री. विपीन काकड यांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एम्.पी.एस्.सी.) परीक्षेत सुयश !
पुणे, १० मे (वार्ता.) – अमरावतीचे श्री. विपीन काकड यांनी एम्.पी.एस्.सी. परीक्षेत यश प्राप्त केले आहे. पंजाब नॅशनल बँकेमध्ये ‘मार्केिटंग ऑफिसर स्केल-१’ म्हणून त्यांची निवड झाली आहे. ते रामनाथी आश्रमात सेवा करणारे सनातनचे साधक श्री. नारायण काकड यांचे पुतणे आहेत. श्री. विपीन काकड हेही सनातनच्या मार्गदर्शनानुसार नामजप आणि अन्य साधना करतात.
या यशाविषयी मनोगत व्यक्त करतांना श्री. विपीन काकड यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी अपयश आल्यास खचून न जाता सतत प्रयत्नरत असायला हवे. मनुष्याने आयुष्यात परिवर्तनशील असावे, त्याविना आपण आव्हानांना सामोरे जाऊ शकत नाही, तसेच ध्यान-धारणा, ‘मेडिटेशन’ आदी गोष्टी तुमच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्व विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.