सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळे कुटुंबीय साधनेसाठी सकारात्मक होणे
‘वर्ष २००५ मध्ये मी सनातन संस्थेशी जोडले गेले. त्या वेळी साधना करण्यासाठी मला घरातून तीव्र विरोध होता, तरीही मी माझी साधना चालूच ठेवली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मी सतत प्रार्थना करायचे, ‘गुरुदेव, तुम्हीच मला यातून बाहेर काढा आणि माझी आध्यात्मिक प्रगती करून घ्या.’ आता माझ्या यजमानांमध्ये पुष्कळ पालट झाला आहे. ते स्वतःहून सनातनची सात्त्विक उत्पादने, दिनदर्शिका आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ घेतात. तसेच प्रत्येक मासाला अर्पण देतात आणि मलाही साधना करण्यासाठी प्रोत्साहन देतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादानेच हे शक्य झाले. त्याबद्दल परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !’
– एक साधिका (१५.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |