Praveen Nettaru Murder : प्रवीण नेट्टारू हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी मुस्तफा पैचार याला २ वर्षांनी अटक
बेंगळुरू (कर्नाटक) – भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी मुस्तफा पैचार याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने हत्येच्या २ वर्षांनी अटक केली. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे गावात ही हत्या करण्यात आली होती. मुस्तफा पैचार याची माहिती देणार्याला ५ लाख रुपयांचे बक्षिसही घोषित करण्यात आले होते.
संपादकीय भूमिकाअशांना पोसत रहाण्यापेक्षा त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते ! |