Dabholkar Murder Case Verdict : (म्हणे) ‘डॉ. दाभोलकरांच्या हत्येमागे सनातन आहे !’ – मिलिंद देशमुख, अंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य
पुणे, १० मे (वार्ता.) – वर्ष २०१६ पासून मी दाभोलकर हत्या प्रकरणाचा पाठपुरावा मी घेत आहे. आज या खटल्याचा निकाल लागला. प्रत्यक्ष गोळ्या मारलेल्यांना शिक्षा झाली, तर ३ जण पुराव्याअभावी सुटले आहेत. खरेतर त्यांच्या विरोधात अजून चांगले पुरावे गोळा करता आले असते. न्यायालयाने असे म्हटलेले नाही की, त्यांचा सहभाग दिसून येत नाही. चांगले पुरावे मिळाले असते, त्यांनाही शिक्षा झाली असती. डॉ. दाभोलकरांच्या हत्येमागे दुसरे-तिसरे कुणी नसून सनातन आहे. अशी प्रतिक्रिया अंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांनी दिली. (साक्षीदारांवर दबाव आणणार्या, घोटाळे करणार्या आणि धादांत खोटे बोलणार्या (अ)विवेकवादी अंनिसवाल्यांनी इतरांना शहाणपणा न शिकवलेलाच बरा ! – संपादक)
Dr #NarendraDabholkar Case Verdict : (म्हणे) ‘डॉ. दाभोलकरांच्या हत्येमागे सनातन आहे !’ – मिलिंद देशमुख, अंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य
(म्हणे) ‘सूत्रधार न सापडणे ही खेदाची गोष्ट !’ – हमीद दाभोलकर, डॉ. दाभोलकर यांचे पुत्र#Sanatan_Innocence_Proved
https://t.co/QopRphAoYC— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 10, 2024
(म्हणे) ‘सूत्रधार न सापडणे ही खेदाची गोष्ट !’ – हमीद दाभोलकर, डॉ. दाभोलकर यांचे पुत्र
मी अजून निकालपत्र बघितलेले नाही. या तपासामध्ये जवळजवळ ११ वर्षे लागली. न्यायव्यवस्थेवरील विश्वास, सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्या आणि विचार संपवण्यासाठी माणसांना संपवणे या पद्धतीच्या विरोधातील हा लढा होता. जोपर्यंत ती प्रवृत्ती आहे, तोपर्यंत हा लढा चालूच राहील, अशी आमची धारणा आहे.
सूत्रधार न सापडणे ही खेदाची गोष्ट आहे; कारण बहुतांश वेळेला अशा प्रकारच्या कटांमध्ये हेच होतांना आपण पहातो की, जी प्यादी असतात, त्यांनाच बलीदान द्यावे लागते. त्यांच्या मागचे जे सूत्रधार असतात, ते मोकळे रहातात. निकालाची माहिती घेऊन पुढच्या लढाईची भूमिका ठरवू. (सूत्रधार सापडण्याची दाभोलकरांना एवढी इच्छा होती, तर खटल्याच्या सुनावणीला उच्च न्यायालयात जाऊन स्टे का आणला ? दाभोलकर हत्येचे अन्वेषण भरकटवण्यास जेवढी अन्वेषण यंत्रणा उत्तरदायी आहे, तेवढेच दाभोलकर कुटुंबीयही उत्तरदायी आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक)