Dabholkar Murder Case Verdict : डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे निर्दोष घोषित !
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल !
पुणे – आताच पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बहुचर्चित डॉ. नरेंद्र दाभोलकर खटल्याचा निकाल दिला. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे ३ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. तर अन्य २ आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना मात्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
A Special Court in Pune acquits the accused Dr. Virendra Singh Tawade, Advocate Sanjeev Punalekar and Vikram Bhave in the #DabholkarMurder case.
Accused Sachin Andure and Sharad Kalaskar sent to life imprisonment pic.twitter.com/jg4eTLwyW4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 10, 2024
बचाव पक्षाचे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांनी निकालाचा आदर राखत म्हटले की, अंदुरे आणि कळसकर यांच्या मुक्ततेसाठी उच्च न्यायालयात धाव घेऊ.