Babri Lock Amit Shah:आघाडी सत्तेत आल्यास राममंदिरास ‘बाबरी’ नावाचे मोठे कुलूप लावतील ! – अमित शहा
जालना – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच अयोध्या येथील राममंदिराचा खटला जिंकला. लगेच राममंदिराचे कामच चालू केले नाही, तर ते पूर्णही केले. काँग्रेस आणि ‘इंडी’ आघाडी यांच्या नेत्यांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले; मात्र त्यांची मतपेटी नाराज होईल म्हणून ते वेगवेगळी कारणे सांगून अनुपस्थित राहिले. ‘इंडी’ आघाडी चुकून सत्तेवर आलीच, तर राममंदिराला ‘बाबरी’ नावाचे मोठे कुलूप लावतील, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. ते जालना येथे भाजप महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ ८ मे या दिवशी शहरात आयोजित प्रचारसभेत बोलत होते.
गृहमंत्री शहा पुढे म्हणाले की,
१. पाकिस्तानचा ‘अजेंडा’ (धोरण) भारतात चालवण्याचे काम राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष करत आहे ! सध्या पाकिस्तान गांधींवर खुश आहे. पाकिस्तानचे लोक प्रतिदिन गांधींचे समर्थन करत आहेत, कारण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानवर ‘एअर स्ट्राइक’ अथवा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करतात, तेव्हा गांधी त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मोदी आतंकवाद्यांना आणि नक्षलवाद्यांना ठार करत आहेत. त्यावरही राहुल गांधी प्रश्नचिन्ह निर्माण करतात. ‘नागरिकत्व संशोधन कायदा रहित करू’, असेही ते म्हणतात.
२. काँग्रेस खासदारांकडे ३५० कोटी रुपये, तर ममता बॅनर्जी यांच्या सचिवाकडे ५० कोटी रुपये सापडले ! ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांनी घोटाळे करून हा पैसा कमावला आहे.
३. गांधी आणि आघाडी यांना तिहेरी तलाक कायदा रहित करायचा आहे. रहित केलेले ३७० कलम पुन्हा लागू करायचे आहे. त्यांना शरीयतच्या कायद्यानुसार या देशाचा कारभार चालवायचा आहे.