‘प्रार्थना’ ही देवाप्रती भाव निर्माण करण्याचे माध्यम !
‘काहींचा देवावर विश्वास नसतो, त्यामुळे ते प्रार्थना करतच नाहीत. कालांतराने थोडा फार विश्वास निर्माण झाला की, स्वेच्छेसाठी (स्वार्थासाठी) प्रार्थना करतात. प्रार्थनेच्या माध्यमातून देवाची अनुभूती आल्यावर त्यांचा देवाप्रती थोडाफार भाव निर्माण होतो. ते या टप्प्याला केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करतात. त्यापुढे गेल्यावर म्हणजेच संत झाल्यावर ‘सर्वकाही ईश्वरइच्छेने होते’, हे लक्षात घेऊन मग पुन्हा प्रार्थना करत नाहीत. थोडक्यात ‘प्रार्थना’ ही देवाप्रती भाव निर्माण करण्याचे माध्यम आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले