Goa Rain Forecast : गोव्यात ११ ते १४ मे या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता
पणजी, ८ मे (वार्ता.) : गोव्यात ११ ते १४ मे या कालावधीत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, तसेच पुढील ७ दिवस अधिकाधिक तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सियस असे असेल, असे हवामान विभागाने कळवले आहे. पणजी येथे ८ मे या दिवशी सर्वाधिक तापमान ३४.२ अंश सेल्सियस, तर कमीतकमी २५.५ अंश सेल्सियस नोंद झाले.