Goa Sound Pollution Remedy : बंद सभागृहातील कार्यक्रमांसाठी रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक लावण्याची अनुमती देण्याचा सरकारचा विचार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा
पणजी, ८ मे (वार्ता.) : बंद सभागृहातील आणि ध्वनी बाहेर जाणार नाही, अशा ठिकाणच्या ‘इव्हेंट’साठी (कार्यक्रमासाठी) रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक लावण्याची अनुमती देण्याविषयी सरकार विचार करत आहे. गोवा हे एक पर्यटन राज्य आहे आणि गोव्याला ‘लग्न समारंभाचे एक ठिकाण’ या नात्याने सरकार प्रोत्साहन देत आहे. यासाठी ध्वनीक्षेपक लावण्यास अनुमती देण्याविषयी सरकारला सकारात्मक विचार करावा लागणार आहे. कायद्यात पालट करण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ख्रिस्त्यांच्या लग्नासाठी रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक लावण्याची अनुमती देण्याची मागणी केली होती.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘केंद्रीय कायद्याच्या अंतर्गत रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक यंत्रणा लावण्यास बंदी आहे.’’