विधान परिषदेच्या ४ मतदारसंघाच्या निवडणुका घोषित : १० जूनला मतदान, तर १३ जूनला मतमोजणी !
मुंबई – लोकसभेची निवडणूक ऐन भरात असतांना विधान परिषदेच्या २ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने निवडणुका घोषित केल्या आहेत. त्यासाठी १० जूनला मतदान, तर १३ जूनला मतमोजणी होईल. या ४ जणांचा कार्यकाल ७ जुलैला संपत आहे. कार्यकाल संपणार्यांपैकी ठाकरे गटाचे मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटाचे किशोर दराडे, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकभारतीचे कपिल पाटील यांचा समावेश आहे. या संदर्भात १५ मे या दिवशी निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होईल.