आला उन्हाळा…आरोग्य सांभाळा !
सध्या चालू असलेल्या या भीषण उन्हाळ्यात स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मे मासातील उन्हात स्वतःच्या आरोग्य रक्षणासाठी आयुर्वेदातील काही सूचना येथे देत आहे.
आरोग्य रक्षणासाठी काय करावे ?
१. लिंबू, वाळा, कोकम सरबत, कैरीचे पन्हे, ऊसाचा रस, ताजे आणि गोड ताक पिणे.
२. पाणी पितांना बसून आणि सावकाश प्यावे.
३. ताजे अन् पचायला हलके जेवण घ्यावे.
४. आहारात काळया मनुका, आवळा, अंजीर, डाळिंब, गुलकंद, मोरावळा यांचा समावेश असावा.
५. उन्हात जावे लागल्यास डोके आणि डोळे यांचे योग्य संरक्षण होईल, असे पहावे.
६. प्रतिदिन रात्री झोपतांना तळपायांना खोबरेल तेल किंवा शतधौत घृताने मालिश करणे.
७. कपडे शक्यतो फिक्या रंगाचे, सुती आणि सैलसर असावेत.
८. डोळ्यांची आग होत असल्यास गुलाबजल घातलेल्या कापडी घड्या ठेवाव्यात.
९. त्वचेची काळजी घेण्यासाठी दूध, साय, तूप, गुलाबजल, कोरफड अशा थंड गोष्टी वापरण्यात याव्यात.
१०. व्यायाम हलका असावा.
काय टाळावे ?
१. उघड्यावरील बर्फ आणि अन्नपदार्थ खाऊ नये.
२. उभे राहून किंवा घटाघट पाणी पिणे टाळावे.
३. अतीतिखट, मसालेदार पदार्थ आणि मद्यपान टाळणे.
– वैद्य वाचासुंदर, एम्.डी. (आयुर्वेद), पुणे.