सद्गुण, प्रीती, विश्वबंधुत्व शिकवतो हा भक्तीसत्संग ।
साधकांना साधनेचे प्रयत्न करतांना त्याला भावभक्तीची जोड देऊन जलद गतीने ईश्वरप्राप्ती व्हावी यासाठी प्रति गुरुवारी भक्तीसत्संग असतो. सौ. शीला दातार यांना भक्तीसत्संगाविषयी सुचलेले काव्य येथे देत आहोत.
भक्तीविना जीवन व्यर्थ सांगतसे हा सत्संग ।
गुरुकृपेने, गुरुवाणीने भिजवी भक्तांचे अंतरंग ।। १ ।।
मनी चित्तीचे रज-तम दूर करी हा सत्संग ।
ईशकृपेच्या अनुभूतीमध्ये करतो भक्ता दंग ।। २ ।।
धर्म, संस्कृती आणि परंपरांचा वेदामृत हा सत्संग ।
प्रयत्नांना दिशा देऊनी, भरतो जीवनी रंग ।। ३ ।।
गुरु, ऋषिमुनी अन् संत कथांचे सार असे हा सत्संग ।
श्रवणीय अन् अनुकरणीय हा जणू सुरेल अभंग ।। ४ ।।
सद्गुण, प्रीती, विश्वबंधुत्व शिकवतो हा भक्तीसत्संग ।
कृतज्ञतेच्या उच्च भावाचे उठती भक्तांमनी तरंग ।। ५ ।।
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– सौ. शीला दातार (वय ६९ वर्षे), बेंगळुरू, कर्नाटक. (२७.१२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |