Hindu Jagran Manch : हिंदु जागरण मंचच्या नेत्याच्या हद्दपारीला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांनी घेतला होता निर्णय !
विट्ला (कर्नाटक) – हिंदु जागरण मंचच्या विट्ला तालुक्याचे सदस्य अक्षय राजपूत यांना निवडणुकीच्या आदल्या रात्री पोलिसांनी घरी जाऊन अटक केली. तसेच त्यांना हावेरी जिल्ह्यात हद्दपार केले. या विरोधात उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ते अरुण श्याम यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन या आदेशाला आव्हान दिले. त्यावर न्यायालयाने हद्दपारीच्या आदेशावर स्थगिती आणली. या वेळी ‘जिल्हा न्याय जागरण’चे अधिवक्ता किशोर कुमार यांनी मंगळुरू जिल्हा न्याय जागरणचे राजेश बोल्लुकल्लू यांना साहाय्य केले.
संपादकीय भूमिकाहिंदुद्वेषी काँग्रेस सरकार हिंदूंसाठी काम करणार्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना हद्दपार करण्याचा आदेश देते; परंतु जातीय दंगली घडवणार्या धर्मांध मुसलमानांना संरक्षण देते. अशा कथित धर्मनिरपेक्ष आणि मुसलमानप्रेमी काँग्रेसचा राजकीय अंतच झालेला बरा ! |