Samajwadi Party Pro-Pakistan Slogans : समाजवादी पक्षाच्या पदाधिकार्यांनी दिल्या ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !
आझमगड (उत्तरप्रदेश ) – जिल्ह्यातील मुबारकपूर येथे समाजवादी पक्षाचे नेते आमदार अखिलेश यादव यांच्यासमोर त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी ‘पाकिस्तान जिंदाबाद… युती का हात, पाकिस्तान के साथ’च्या घोषणा देत असलेला व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. आझमगड शहराचे पोलीस अधीक्षक शैलेंद्र लाल यांनी सांगितले, ‘आक्षेपार्ह घोषणाबाजी असलेला एक व्हिडिओ माझ्या निदर्शनास आला आहे. या व्हिडिओची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.’
अखिलेश यादव आझमगड लोकसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार धर्मेंद्र यादव यांच्यासाठी त्यांच्या भागात जनसंपर्क करत दिसत आहेत. व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत पक्षाचे नेते आणि स्थानिक लोक मोठ्या संख्येने दिसत आहेत.
संपादकीय भूमिकाअशा पाकप्रेमींचा भरणा असलेला पक्ष म्हणजे लोकशाहीला लागलेला कलंक आहे. या पक्षाने उत्तरप्रदेशात बराच काळ राज्य करणे, हे संतापजनक होय ! |