‘इ.व्ही.एम्.’ची पूजा केल्याप्रकरणी रूपाली चाकणकर यांच्या विरोधात पुणे येथे गुन्हा नोंद !
पुणे – राज्यात सध्या लोकसभेच्या तिसर्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यामध्ये मतदान केंद्रावर ‘इ.व्ही.एम्.’ची पूजा केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रूपाली चाकणकर यांचे ‘इ.व्ही.एम्.’ची पूजा करतांनाचे एक छायाचित्र व्हायरल झाले होते. हा ‘व्हिडिओ’ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक माध्यमांवर अनेकांनी निवडणूक आयोगाच्या ‘एक्स अकाऊंटला’ टॅग करत याविषयी विचारणा केली आहे.