भगवंताने ठेवलेल्या परिस्थितीत साधना करणे, ही तपस्या आहे !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे साधनेसंदर्भातील अमूल्य मार्गदर्शन
साधिका : घरी असतांना माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत नव्हते. आश्रमात मला सर्व प्रयत्न करायला जमले, उदा. १५ स्वयंसूचना सत्रे करणे आजपर्यंत जमले नव्हते, तेही जमले.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : आश्रमातील वातावरण सात्त्विक आहे. येथे मायेतील काहीच नाही. त्याचा परिणाम म्हणून व्यष्टी साधना चांगली होते. समाजात गेल्यावर साधनेचे प्रयत्न करायला आपल्याला अधिक श्रम घ्यावे लागतात. हे प्रयत्न म्हणजे एक तपस्याच आहे. बर्याच जणांना प्रतिकूल वातावरणात प्रयत्न करावे लागतात. भगवंताने ठेवलेल्या स्थितीत साधना करणे, ही तपस्या आहे. त्यामुळे पुढील प्रयत्नांची दिशा ठरवून आताच नियोजन करा. ‘आपण काय करू शकत नाही ?’ या ऐवजी ‘आपण काय करू शकतो ?’, यावर मनाचे लक्ष केंद्रित करा. (२९.९.२०२३)