Five ISIS Terrorists Sentenced : पुणे येथील तरुणीसह इस्लामिक स्टेटच्या ५ आतंकवाद्यांना सक्तमजुरी !
देहलीतील विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली
पुणे : इस्लामिक स्टेटच्या आतंकवादी विचारधारेचा प्रसार, तसेच देशभरात आतंकवादी कारवाया करण्याच्या सिद्धतेत असलेल्या ५ आतंकवाद्यांना देहलीतील विशेष एन्.आय.ए. न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. जहानजेब वाणी, त्याची पत्नी हिना बेग, सादिया अन्वर शेख, नबील एस्. खत्री, अब्दूर बसित अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. देहलीतील विशेष न्यायालयाने आरोपी जहानजेब सामी याला विविध कलमान्वये दोषी ठरवून २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याची पत्नी हिना बेग हिला ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सादिया शेखला ७ वर्षे, तसेच नबील खत्री याला ८ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सादिया शेख ही पुणे येथील असून या प्रकरणामुळे पुणे शहर हा आतंकवाद्यांचा अड्डा बनत असल्याचे समोर आले आहे.
बासित चालवायचा इस्लामिक स्टेटचे मासिक !
अब्दुर बसित याला शिक्षा सुनावण्यात आली. त्याने शिक्षेचा कालावधी न्यायालयीन कैदेत पूर्ण केला आहे. बसित याने इस्लामिक स्टेटच्या आतंकवादी विचारधारेचा प्रसार करण्यासाठी सामीला ‘व्हॉईस ऑफ हिंद’ हे मासिक चालू करण्यासाठी साहाय्य केले होते.
महत्त्वाच्या शहरांमध्ये घडवून आणायचा होता बाँबस्फोट !
मार्च २०२० मध्ये देहली पोलिसांच्या विशेष पथकाने जहानजेब वाणी आणि त्याची पत्नी हिना यांना अटक केली होती. इस्लामिक स्टेटच्या आतंकवादी विचारधारेचा प्रसार आणि देशविघातक कारवाया यांमध्ये दोघे सहभागी असल्याचे उघड झाल्यानंतर देहली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. हे आतंकवादी देशातील महत्त्वाच्या शहरात बाँबस्फोट घडवण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती अन्वेषणात मिळाली होती. त्यानंतर या प्रकरणाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) चालू केले.
आतंकवाद्यांमध्ये अब्दुर रहमान या आधुनिक वैद्याचा समावेश !
चौकशीत बेंगळुरू येथील आधुनिक वैद्य अब्दूर रहमान याचे नाव आले आहे. (मुसलमान उच्चविद्याविभूषित झाला, तरी त्याच्या कट्टर मानसिकतेमध्ये कोणताच फरक पडत नाही, याचे हे उदाहरण ! – संपादक) वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर इस्लामिक स्टेटच्या आतंकवादी विचारधारेच्या प्रभावाखाली आलेला डॉ. रहमान डिसेंबर २०१३ मध्ये सीरियात गेला होता. तेथे इस्लामिक स्टेटच्या आतंकवादी कारवायांमध्ये रहमान सामील झाल्याचे लक्षात आले होते. या प्रकरणात ५ जणांविरुद्ध एन्.आय.ए.ने २० मार्च २०२० या दिवशी देहलीतील विशेष न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले होते. त्यानंतर पुरवणी आरोपपत्र १२ जानेवारी २०२१ ला प्रविष्ट करण्यात आले होते. या खटल्यात रहमानविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले असून अद्याप त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली नाही.
संपादकीय भूमिका
|