Action Against Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची भारतातील कुलगुरूंची मागणी !
भारतातील कुलगुरूंच्या नियुक्तींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे प्रकरण
नवी देहली – भारतातील विद्यापिठांतील कुलगुरूंच्या नियुक्त्या गुणवत्तेच्या ऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संलग्नतेच्या आधारावर केल्या जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला होता. या विधानाला विद्यापिठांतील अनेक कुलगुरु आणि शिक्षणतज्ञ यांनी विरोध दर्शवला आहे. १८१ कुलगुरु आणि शिक्षणतज्ञ यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात खुले पत्र लिहिले आहे. त्यांनी राहुल गांधी यांनी कुलगुरूंच्या नियुक्ती प्रक्रियेविषयी खोटेपणा पसरवल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
Action Against Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची भारतातील कुलगुरूंची मागणी !
भारतातील कुलगुरूंच्या नियुक्तींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे प्रकरण
वाचा :https://t.co/vuomtmoA8x
संघद्वेषाची कावीळ झालेल्यांना प्रत्येक गोष्ट एकाच त्याच… pic.twitter.com/k8GkQnAJwj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 7, 2024
शिक्षणतज्ञांनी एका खुल्या पत्रात म्हटले आहे की, कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रिया कठोर आणि पारदर्शक असून गुणवत्ता, शैक्षणिक पात्रता आणि निष्ठा या मूल्यांना मूर्त रूप देत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही निवड पूर्णपणे शैक्षणिक आणि प्रशासकीय कौशल्य यांच्यावर आधारित आहे आणि ती विद्यापिठांच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकासंघद्वेषाची कावीळ झालेल्यांना प्रत्येक गोष्ट एकाच त्याच दृष्टीकोनातून पहाण्याची सवय झाली आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही ! |