साधिकेने अनुभवलेली सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपाची परिणामकारकता !
१. साधिकेला मूतखड्याचा त्रास होणे
‘जुलै २०२३ मध्ये एकदा मला मूतखड्याचा त्रास होत होता. त्याच्या आधी एक ते दीड मासापासून मला शौचाला कडक होण्याचा त्रास होत होता. वैद्यांनी मला सांगितले, ‘‘शौचाला कडक होण्याने मूतखड्याचा त्रास होऊ शकतो.’’
२. साधिकेने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप एकच दिवस करणे आणि तिचा त्रास दूर
होणे
मला सायंकाळपासून गुदद्वाराची त्वचा खेचल्यासारखी जाणवून चालायला त्रास होत होता. मी याविषयी सहसाधिका सुश्री (कु.) सविता भणगे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४७ वर्षे) यांना सांगितले. तेव्हा त्यांनी मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मूतखड्याच्या त्रास दूर होण्यासाठी सांगितलेला
‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री हनुमते नमः।’ हा नामजप करायला सांगितला. तो नामजप मी एकच दिवस केला आणि मला होणारा त्रास दूर झाला.
३. कृतज्ञता
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्या कृपेमुळे माझा त्रास दूर झाला. ‘सद्गुरु गाडगीळकाकांनी शोधलेले नामजप प्रभावी आहेत’, हे मला ठाऊक होते. त्यांनी सांगितलेल्या नामजपाची परिणामकारकता मला प्रत्यक्ष अनुभवायला आली. त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. विद्या गरुड, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |