‘हमास’विषयी सहानुभूती दाखवणार्या मुख्याध्यापिकेकडे व्यवस्थापनाने मागितले स्पष्टीकरण !
मुख्याध्यापिकेने आतंकवादी संघटनेला पाठिंबा दिल्याचे प्रकरण !
मुंबई – सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी २४ एप्रिल या दिवशी हमासची तळी उचलणार्या एका संदेशावर सकारात्मक मत व्यक्त केले होते. परवीन शेख यांच्या या भूमिकेविषयी शाळा व्यवस्थापनाने त्यांना नोकरीचे त्यागपत्र देण्यास सांगितले; मात्र त्यांनी त्यागपत्र देण्यास नकार दिला. एवढेच नाही, तर शेख त्याविषयी आता प्रसिद्धीमाध्यमांकडे त्यांची भूमिका मांडत आहेत. यावरून व्यवस्थापनाने आता त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.