मंगलप्रभाती करावयाचा संकल्प
आज मंगलप्रभाती दृढ संकल्प करा, ‘सुख-दुःखात, लाभ-हानीत आणि मान-अपमानात सम राहू. संसाराच्या प्राप्ती आणि अप्राप्तीमध्ये खेळकर वृत्ती ठेवून आपल्या आत्म्यामध्ये येऊ. कोणताही व्यवहार करतांना तो तत्परतेने करू. ज्ञानाने युक्त होऊन सेवा करू, मूर्खपणे नाही ! ज्ञान-विज्ञानाने तृप्त बनू, कोणतेही कार्य करतांना ते तत्परतेने आणि सावधपणे करू !’
(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)