अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सव उत्साहात पार पडला !
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – श्री स्वामी समर्थ महाराज यांचा १४६ वा पुण्यतिथी उत्सव प्रज्ञापुरी अक्कलकोट नगरीत उत्साही वातावरणात पार पडला. पुण्यतिथीच्या निमित्ताने स्वामींच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून सहस्रोंच्या संख्येने भाविक येथे आले होते. स्वामींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविक आले होते. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. स्वामी नामाच्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.