ठाणे येथे ७२ वर्षार्ंच्या मुसलमानाकडून ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार !
आरोपीला अटक
ठाणे – येथे कमर अन्सारी या बेकरी चालवणार्या ७२ वर्षीय वृद्धाने त्याच्या दुकानात आलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. ३० एप्रिलला दूध घेण्यासाठी आलेल्या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून त्याने दुकानाच्या आतील भागात बोलावले. मुलीवर अत्याचार केल्यावर त्याने तिला १० रुपये देऊन ‘कुणाला सांगितलेस, तर आई-वडिलांना ठार मारीन’ अशी धमकी दिली.
मुलीने घरी येऊन सर्व प्रकार सांगितल्यावर आईने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. अन्सारीवर ३७६, ३७६ (ए, बी), ५०६ आणि पॉक्सो कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. ४ मे या दिवशी त्याला कारागृहात पाठवण्यात आले.
संपादकीय भूमिकासमाजात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक ! |