Terror Threat T20 World Cup : वेस्ट इंडिजमध्ये होणार्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आक्रमणाची पाकिस्तानस्थित आतंकवादी संघटनेची धमकी
न्यूयॉर्क – अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे १ जून २०२४ पासून चालू होणार्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आक्रमण करण्याची धमकी पाकिस्तानस्थित ‘इस्लामिक स्टेट खोरासान’ या आतंकवादी संघटनेने दिली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा परिसर हे आतंकवाद्यांचे आश्रयस्थान बनले आहे.
या धमकीनंतर संबंधित यंत्रणांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. ‘वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळा’मध्ये समाविष्ट असलेल्या कॅरेबियन देशांनी या धमकीनंतर सुरक्षाव्यवस्था मजबूत करणे चालू केले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटचे प्रमुख जॉनी ग्रेव्हज यांनी म्हणाले, ‘आम्ही सर्वांना खात्री देऊ इच्छितो की, ‘आयसीसी टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी येणारा प्रत्येक खेळाडू आणि प्रेक्षक यांची सुरक्षा, ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.’
या स्पर्धेसाठी अमेरिकेत नवीन ‘स्टेडियम’ उभे केले जात आहे. अमेरिकेत प्रथमच मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकायावरून ‘पाकिस्तान आतंकवाद्यांचे आश्रयस्थान आहे’, हे अमेरिका आणि इतर पाश्चात्य देश यांनी आता तरी मान्य करून पाकला निधी देण्याचे थांबवावे ! |